Join Us

Call 9970473161 Sudin News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.9970473161 SUDIN NEWS रिपोर्टर बनने के लिये संपर्क9970473161

जागतिक महिला दिनानिमित्त डिजिटल प्रेस क्लब इंडिया द्वारा आयोजित ‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’ सोहळा संपन्न

Responsive Ad Here

    



जागतिक महिला दिनानिमित्त डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया व मातृशक्ती संतोषी फाउंडेशन च्या वतीने आयोजित ‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’   कार्यक्रम मलकापूर येथील  भातृ मंडळ येथे आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला .

 आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001_2015 प्रमाणित प्रेस क्लब ऑफ इंडिया व मातृशक्ती संतोषी फाउंडेशन च्या वतीने  जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील  कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होतेत्यावेळी  782 प्रस्तावांपैकी निवड करून 219  मान्यवरांना ‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’    प्रदान करण्यात आला. यामधे  शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य करणाऱ्या  महिला शिक्षक, डॉक्टर, आषा सेविका, परिचारिका, यांना  सुद्धा ‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’ देऊन गौरव करण्यात आला.

‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’  वितरण  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुनम कुलकर्णी (कृषी सहाय्यक अधिकारी ), कार्यक्रमाचे उद्घाटक धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, तर प्रमुख अतिथी अशांतभाई वानखेडे न.प, शिक्षण सभापती,  डॉ. सुरेखा जैन तालुका अधिकारी, डॉ. जयश्रीताई खर्चे पॅथॉलॉजिस्ट, डॉ. शारदा झवर, डॉ. मोनिका गोठी, डॉ. अंतिमा गोठी, डॉ. सुषमाताई गोठी, मंगलाताई पाटील काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष, प्रा. संगीता अनिल  खर्चे इंजिनिअरिंग कॉलेज लायब्ररीन,  डॉ. ममता पांडे प्राचार्य हिराबाई संचेती कन्या शाळा, एड. सुवर्णाताई चोपडे, जयश्रीताई  बोंबटकार नगरसेविका, डॉ.सौ.सुदीप्ता सरकार प्राचार्य sos, प्रा. अविनाश डाके उपप्राचार्य sos, नेहाताई सदावर्ते संयोजिका मातृशक्ती  हे होते

कार्यक्रमाची सुरुवात  आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, राजकीय ,कला, वैद्यकीय,  उद्योजक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा ‘डायनॅमिक इंडिया अवॉर्ड – २०२६’   देऊन करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता जाधव मॅडम यांनी  तर आभार प्रदर्शन रवींद्र गणगे सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, श्रीकृष्ण तायडे,  प्रा. प्रकाश थाटे, सुधाकर तायडे, प्रमोद हिवराळे, मयूर लड्डा, अमोल वानखेडे, किशोर सोनवणे, प्रदीप इंगळे यांनी परिश्रम घेतले