निवेदनात म्हटले आहे की अकोले आदिवासी तालुक्यामध्ये रेशनिंगचे धान्य मे, जून, महिन्यामधील धान्य वाहतुकीच्या नावा खाली उशिरा बऱ्याच भागामध्ये पोहचले आणि आता ही जूलै महिन्याचे धान्य अद्याप पर्यंत बऱ्याच भागामध्ये आजून पोहचले नाही.
बीपीएल, अंत्योदय, अन्नपुर्णा, प्राधान्यक्रम हे सामान्य ग्राहक, नागरिक रेशनिंग धान्यापासून वंचित राहू नये.आदिवासी भागातील सर्वात लांबच्या व पाऊस,अतीवृष्टी मधिल गावात सर्वात पहिले रेशनिंगचे धान्य पोहच झाले पाहिजे. बीपीएल, अंत्योदय,अन्नपूर्णा, प्राधान्यक्रम रेशनिंग धान्य वाहतुकीचे साधने गाड्या या मध्ये वाढ करण्यात यावी. रेशनिंग धान्य वाहतूक एजन्सी, ठेकेदार व त्यांच्या मार्फत रेशनिंग धान्य वाहतूक नेमलेले ठेकेदार हे शासनाने ठरऊन दिलेल्या नियमाचे, नियमावलीचे पालन करीत नसल्यास त्यांना नोटीस पत्र व्यवहार अन्यथा काळ्या यादीत टाकावे.वरील सर्व बाबींकडे लक्ष घालून सर्व
सामान्य ग्राहक रेशनिंग धान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता,दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष मच्छींद्र मंडलीक, सचिव राम रुद्रे, माधवराव तिटमे रामदास पांडे, रजनीकांत भांगरे, ज्ञानेश्वर पुंडे, अर्जुन वैद्य, अनंत घाणे, रामदास पवार, अशोक उघडे, गंगाराम धिंदळे तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर, राजेंद्र घायवट, भाऊसाहेब वाकचौरे प्रा.डॉ. सुनिल शिंदे, जालिंदर बोडके, गंगाराम धिंदळे, शांताराम दराडे,मोहन मुंढे, सुरेश गभाले, सखाराम खतोडे, राजेंद्र लहामगे, रामहरी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे,भाऊसाहेब आभाळे, दत्तात्रय मुठे,प्रदीप हासे, कैलास तळेकर, प्रमोद मंडलिक,भगवान करवर, पांडुरंग पथवे, दत्ता ताजणे, सुदाम मंडलिक आदींचे नावे आहे. निवेदनाच्या प्रती जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर, जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब अहिल्यानगर यांना पाठविण्यात आल्या आहेत.
