Join Us

Call SUDINNEWS ब्रेकिंग : सुदिनन्यूजसाठी जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती सुरू – इच्छुकांनी आजच संपर्क साधा! 9172843161 SUDINNEWS 9970473161

ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा राज्य अभ्यासवर्ग ८ व ९ ऑगस्ट रोजी; नोंदणीसाठी साधकांना आवाहन

Responsive Ad Here


अकोले :(सुदिनन्यूज नेटवर्क)

ग्राहक हक्क संरक्षण, ग्राहक जनजागृती आणि संघटनात्मक कार्य अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने राज्य अभ्यासवर्ग – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यासवर्ग दि. ८ व ९ ऑगस्ट २०२६ रोजी शिवराज पॅलेस, मुंबई–पुणे महामार्ग, जंभूळ फाटा, वडगाव मावळ, ता. मावळ, जि. पुणे – ४१२१०६ येथे संपन्न होणार आहे.

राज्यभरातील सर्व साधक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अभ्यासवर्गासाठी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला नोंदणी फॉर्म मराठी भाषेत भरावयाचा असून, फॉर्ममधील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून शेवटी Submit बटणावर क्लिक केल्यानंतरच नोंदणी पूर्ण होणार असल्याचे ग्राहक पंचायत महाराष्ट्रने स्पष्ट केले आहेअभ्यासवर्गासाठी प्रति व्यक्ती ३०० रुपये नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले असून, ही रक्कम नोंदणी फॉर्ममध्ये दिलेल्या QR कोडद्वारे भरावी. शुल्क भरल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट अभ्यासवर्गासाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत व्हॉट्सअॅप समूहावर पाठविणे आवश्यक आहे.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक सहभागीने 'GPM अभ्यास वर्ग २०२६' या अधिकृत व्हॉट्सअॅप समूहात सहभागी व्हावे. समूहात प्रवेश घेतल्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट, स्वतःचे संपूर्ण नाव आणि गावाची माहिती पोस्ट करावी. अभ्यासवर्गाचे वेळापत्रक, निवास व्यवस्था, विविध सत्रांची माहिती तसेच इतर सर्व आवश्यक सूचना या व्हॉट्सअॅप समूहाद्वारे वेळोवेळी देण्यात येणार आहेत.

राज्य कार्यकारिणीने राज्यातील सर्व साधकांना कोणताही विलंब न करता लवकरात लवकर नोंदणी करून राज्य अभ्यासवर्गात सहभागी होण्याचे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी प्रसिद्धीस दिली आहे.तरी सर्व जागरूक ग्राहकांनी उपस्थित रहावे आणि आपणही एक जागरूक ग्राहक आपल्या हक्कासाठी लढण्यास तयार व्हावे यासाठी जागरूक ग्राहकांनी सहभागी व्हावे....! असे आवाहन मच्छिंद्र मंडलिक यांनी केले आहे.