Join Us

Call SUDINNEWS ब्रेकिंग : सुदिनन्यूजसाठी जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती सुरू – इच्छुकांनी आजच संपर्क साधा! 9172843161 SUDINNEWS 9970473161

दूध उत्पादकांना दिलासा; गायीच्या दुधाचा खरेदी दर 38 ते40 रुपयांवर, भेसळविरोधी कारवाईनंतर दूध संकलनात घट

Responsive Ad Here

मुंबई : (सुदिनन्यूज नेटवर्क)

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड म्हणून गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ झाली असून काही दूध संघांकडून प्रतिलिटर 38ते40रुपयांपर्यंत दर देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी राज्यातील दूध संकलनात सुमारे २० लाख लिटरची घट झाल्याचीही चर्चा असून, या घडामोडीमागे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) भेसळविरोधी कठोर मोहिमेचा परिणाम असल्याचे दुग्ध व्यवसायाशी संबंधित घटकांचे मत आहे.

        अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर दूध भेसळ रोखण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. विविध ठिकाणी छापे, नमुन्यांची तपासणी, परवान्यांची पडताळणी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. यामुळे दूध व्यवसायात शिस्त निर्माण होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे.

        दूध संकलनात झालेली घट ही दूध उत्पादन कमी झाल्यामुळे नसून, भेसळयुक्त किंवा अनधिकृत दूध पुरवठ्यावर नियंत्रण आल्याचा परिणाम असू शकतो, अशी चर्चा दुग्ध व्यवसाय क्षेत्रात सुरू आहे. त्यामुळे बाजारात शुद्ध दुधाचा पुरवठा तुलनेने कमी झाला असून त्याचा परिणाम खरेदी दरावर झाल्याचेही काही तज्ज्ञांचे मत आहे.

       शुद्ध दुधाची मागणी कायम असताना पुरवठा कमी झाल्याने अनेक दूध संघ आणि खासगी डेअऱ्यांनी खरेदी दरात वाढ केली आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा थेट आर्थिक लाभ मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

      दुसरीकडे, ग्राहकांच्या दृष्टीनेही ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेमुळे बाजारात अधिक सुरक्षित आणि दर्जेदार दूध उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या डेअऱ्या, संकलन केंद्रे आणि विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा कायम राहणार असल्याने संपूर्ण दूध साखळीत पारदर्शकता वाढण्याची शक्यता आहे.                                                

 दुग्ध व्यवसायाशी संबंधित जाणकारांच्या मते, दूध उत्पादकांना योग्य दर, ग्राहकांना सुरक्षित दूध आणि बाजारात गुणवत्तेला प्राधान्य अशी तिहेरी सकारात्मक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भेसळविरोधी कारवाई सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे. आगामी काळात दूध संकलन, दर आणि बाजारातील स्थितीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.